Sunday, June 8, 2014

तिने वाचावी म्हणून,
कविता लिहण्याची घाई….
पण वाट बघून-बघून शेवटी,
कागदावरच वाळून जाते शाई…
@सतीश भूमकर…
०९.०६.२०१४

Saturday, January 11, 2014

                ...चारोळी-०३...

नजरेचे बाण जरा जपून मार
त्याने कित्येक इथे घायाळ केले...

अन बाण लागून जिव्हारी इथे
जहालवादी प्रेमवीर ही मवाळ झाले... 


                  @सतीश भूमकर...

Thursday, January 9, 2014

                     ...चारोळी-०२... 

तिला घाबरवून सोडणारी ती
वीज मला जरा जास्तच आवडते..

कारण कडाडते जेव्हा ती आकाशी
तेंव्हा ती नकळत मिठीत माझ्या येते..

                       @सतीश भूमकर...
                           ...फक्त तूच देवा...

दमत नाहीस का रे पांडुरंगा
कर कटेवर ठेवून...

कंटाळत नाहीस का रे कधी
सारख्या मागण्या ऎकून...

जीव विटत नाही का रे
सारख विटेवर उभा राहून..

नाही वाटत का तुला यावं
मस्त चौपाटीवर फिरून

महाबळेश्वरला दोन - तीन
दिवस बघावं राहूनं..

आलं जरी मनात तरी देवा तू
इच्छा तुझी मारत असशील..

अन तुझ्या भक्तांना ताराया
असाच चिरकाळ उभा राहशील..

                            @सतीश भूमकर...